खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मेरडा गावचे सुपुत्र व उद्योजक हलगा ग्राम पंचायतीचे सदस्य शिक्षणप्रेमी महाबळेश्वर पाटील गेल्या कित्येक वर्षापासुन मेरडा प्राथमिक मराठी शाळेत हजर विद्यार्थ्याना प्रत्येक दिवसाला एक रूपया देण्याचा उपक्रम राबविला. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्याची पटसंख्या वाढली, मुलाना नियमित शाळेत जाण्याची सवय लागली. त्याच्या या उपक्रमामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनाही आर्थिक मदत झाली.
यंदाही ग्राम पंचायत सदस्य महाबळेश्वर पाटील यांनी १ जुन रोजी शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम आयोजित केला.
यावेळी कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य प्रविण गावडा, सामाजिक कार्यकर्ते परशराम मादार, सीआरपी श्री. मुल्ला, शाळेचे शिक्षक लक्ष्मण देसाई, कन्नड शिक्षक श्री. भरमाप्पणावर, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत लक्ष्मण देसाई यांनी केले. उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य महाबळेश्वर पाटील व पाहुण्याच्याहस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
आभार लक्ष्मण देसाई यानी मानले.
