खानापूर (प्रतिनिधी) : शहरातील तहसील कार्यालय ते रेल्वे स्टेशनपर्यंत असलेल्या रस्त्यावर नगरपंचतीच्याजवळ भला मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा धोकादायक आहे. खानापूर शहरात नुकताच मुसळधार पावसाने रस्त्याची वाट लावली त्यामुळे प्रवाशी वर्गाचे आतोनात हाल होत आहेत.
असे असताना खानापूर शहरातील रेल्वे स्टेशनवर रोडवरील नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूला भला मोठा खड्डा गेल्या कित्येक महिन्यापासून तसाच आहे.
मात्र येथूनच नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारीवर्ग नेहमीच ये-जा करतात. कुणाच्याच लक्षात खड्ड्याबाबत विचार आला नाही. या खड्ड्यात पडून कुणाचा तरी मृत्यू झाला तरच अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार तोपर्यंत या खड्ड्याबाबत कधीच विचारपूस होणार नाही.
तेव्हा अपघात होण्यापूर्वीच नगरपंचायतीने या खड्ड्याचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.
प्रतिक्रिया
रेल्वे स्टेशन रोडवरील खड्ड्यात पडून कुणाचा जीव गेला तरच नगरपंचायतीला जाग येणार? तोपर्यंत हा खड्डा बुजविण्याची बुद्धी नगरपंचायतीला येणार नाही. यासाठी नगरपंचायत या खड्ड्यात पडून कोणीतरी मरेल याची वाट पाहत आहे.
– राजेंद्र रायका, भाजपा शहराध्यक्ष.
Check Also
गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश
Spread the love खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …