खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीकाठच्या बाजुला असलेल्या मोक्षधामाची झालेली अवस्था मोठी बिकट होती. कारण नुकताच मुसळधार पावसाने खानापूर शहरासह तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले.
नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरातून मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे पाणीच पाणी झाले.
दुर्गानगर, मारूतीनगरसह शहरात पाणीच पाणी झाले. मलप्रभा नदीच्या प्रवाहातून वाहत आलेला चिखल, झाडांचे ओंढके, घाण पाणी यामुळे सर्वच नागरिक हैराण झाले आहेत.
अशातच खानापूर शहराच्या मोक्षधामातही अतिवृष्टीमुळे मलप्रभा नदीच्या प्रवाहातून आलेला चिखल, झाडाचे ओंढके, घाण पाणी यामुळे मोक्षधामाची अवस्था फार कठीण झाली होती.
याची जाणीव खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याना आली. त्यामुळे या युवामोर्चाच्या कार्यकर्त्यानी दिवसभर लागुन मोक्षधामाची स्वच्छता मोहिम राबवून मोक्षधाम संपूर्णपणे स्वच्छ केला.
यावेळी युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी हातात बुट्या, पावडे घेऊन संपूर्ण मोक्षधाम स्वच्छ केला.
या त्यांच्या कार्याबद्दल खानापूर शहरातून भाजप मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
प्रतिक्रिया
मुसळधार पावसाने खानापूर शहराला हैराण करून सोडले. अनेक कुटूंबाना मलप्रभा नदी पाण्याच्या प्रवाहाने हैराण करून सोडली. असे असताना येथील मोक्षधामाची अवस्था वेगळी नव्हती. भाजपच्या युवा मोर्चाकडून मोक्षधामाची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी भाजप युवामोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते
– शिवा मयेकर, भाजप युवा कार्यकर्ता, खानापूर.
