खानापूर : परभणी जिल्ह्यातील एक इसम विमनस्क अवस्थेत खानापूर तालुक्यातील शिवठाण रेल्वे ट्रॅकच्या आसपास फिरत असताना रेल्वे किमेन विष्णू नाळकर यांना भेटला. त्यांच्याकडून तो थोडा वेळ बोलत राहिला पिण्यासाठी पाणी मागितले. विष्णू यांनी बोलता बोलता त्याला तू कुठून आलास इथे, काय करतोस असे विचारले असता आपण परभणी जिल्ह्याचा असल्याचे त्याने सांगितले. बोलत असताना त्याचा फोन नंबर मागून घेतला तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी सांगितले की, मागील साडेतीन वर्षांपासून ते असे फिरत आहेत. त्यांचे नाव हेमंत चकोर असे आहे आणि आपण लगेच येतो त्याला पकडून ठेवा असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. मात्र हेमंत चकोर हा पुन्हा जंगलात पळून गेला त्याचे कुटुंबिय आल्यानंतर रेल्वे किमेन विष्णू नालकर, सीपीआय सुरेश शिंगे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू वीर यांनी हेमंत चकोर यांची शोधाशोध करण्यास परिश्रम घेतले आणि हेमंत चकोर याला त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. मानसिक अस्वास्थ्यातून तो घरातून बाहेर पडला होता असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.
