खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम सोमवारी दि. 13 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक मल्लू धुळापा पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, जेडीएसचे नेते नासीर बागवान, बेळगाव येथील रामकृष्ण मठाचे ओंकारेश्वर महाराज, बाबू पाटील (मास्केनट्टी), मिथुन पाटील, पांडुरग लोटूकर, ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन करण्यात आले.
त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते स्लॅब भरणी कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना जेडीएसचे नेते नासीर बागवान म्हणाले की, हनुमान मंदिराच्या इमारतीच्या उभारणीसाठी कळसाचे काम, मंदिरातील फरशीचे, शिवपुतळा उभारण्यासाठी मी स्वत: मदत करणार.
यावेळी कार्यक्रमात ओंकारेश्वर महाराज, आम आदमीचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाला पांडुरंग लोटूकर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
गावातील पंचमंडळी, नागरिक, महिलावर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार नरसिंग हलशीकर यांनी मानले.
