खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील निलावडे येथील रेशन दुकानाला कोकणवाडा ग्रामस्थाना, जांबोटी येथील रेशन दुकानाला के. सी. कापोली, विजयनगर ग्रामस्थाना, तिर्थकुंडे रेशन दुकानाला कौलापूरवाडा ग्रामस्थाना जंगलातून ये-जा करावी लागते. तसेच एक दिवस थम देण्यासाठी व एक दिवस रेशन घेण्यासाठी यावे लागते. यासाठी आठवड्यातून एक दिवस गावात येऊन रेशन वितरण करावे. नागरिकांची समस्या दुर करावी. तसेच किम्स हाॅस्पिटल बेळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावे. कारण राज्यात बेंगलुर जिल्ह्यापाठोपाठ बेळगाव जिल्ह्याचा नंबर लागतो. अशा जिल्ह्याच्या ठिकाणी किम्स हाॅस्पिटल व्हावे, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपतहसीलदार के. वाय. बिद्री व के. आर. कोलकार यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील, शिवाजी गुंजीकर, गोपाळ गुरव शहर अध्यक्ष, महादेव पाटील, रविराज मुतगेकर, माधव कवळेकर, सागर देसाई, रमेश कौदलकर, लक्ष्मण सिंगाळे, नारायण देवगेकर, दत्ता बिडकर, दत्ताराम पाटील, आदी उपस्थित होते.
Check Also
खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
Spread the love खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा …