खानापूर : अग्निपथ विरोधात खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी आज रविवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत शिवस्मारक चौक खानापूर येथे लाक्षणिक उपोषण केले. केंद्र सरकारच्या अग्निपथ धोरणाच्या विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
या आंदोलनाला रयत संघटनेचे श्री. बसनगौडा पाटील व त्यांच्या साथीदारांनी आपला पाठींबा दर्शविला. तसेच कन्नड रक्षक वेदिका संघटनेचे दशरथ बानोशी व आरोग्यप्पा पादांकट्टी यांनीही आपला पाठिंबा दर्शविला त्याचप्रमाणे या आंदोलनात माजी सैनिक संघटनेने आपला सहभाग दर्शवून अंजलीताईच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तसेच केंद्र सरकारच्या तुघलकी निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
अग्निपथ आंदोलनात तालुक्यातील विविध संघटनांसह ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून केंद्र सरकार विरोधी अग्निपथ आंदोलन यशस्वी केले.