खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक, रस्ते पुलाची वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. अशाच प्रकारे नागरगाळी मार्गावरील पूल मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झाले आहे.
त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे.
खानापूर, नंदगड, नगरगाळी मार्गावरून जाणाऱ्या बस वाहतुक पूर्णतः बंद झाली आहे. यामुळे या मार्गावरून नागरगाळी, अळणावर, हल्याळ, दांडेली आदू बसेस पूर्णतः बंद झाल्या आहेत.
या भागातील नागरिकांचा तसेच विद्यार्थी वर्गाचा नेहमीच बेळगावशी संबंध येतो. मात्र नागरगाळी मार्गावरचा पूल खराब झाला आणि बससेवा बंद झाली.
त्यामुळे विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी पुलाची पहाणी करून लवकरात लवकर रस्त्याची दुरूस्ती करून बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी विद्यार्थी व नागरिकांतून होत आहे.
प्रतिक्रिया
बससेवा जोपर्यंत सुरू होत नाही. तोपर्यंत बेळगावचा संपर्क होत नाही. आणि शैक्षणिक नुकसान होणार यासाठी पुलाची दुरूस्ती होणे गरजेचे आहे.
– विद्यार्थी, नागरगाळी