Saturday , July 27 2024
Breaking News

पुनर्वसनाबाबत कठोर निर्णय घेऊ, पाठीशी रहा; मुख्यमंत्री ठाकरे

Spread the love

उद्धव ठाकरे यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा
कोल्हापूर (वार्ता) : ‘मला महापुराच्या प्रकरणात राजकारण करायचे नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘पुनर्वसनाबाबत काही कठोर निर्णय घेऊ, या निर्णयांच्या पाठीमागे उभे रहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौर्‍यावर असून त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘महापुराचा तडाखा बसल्याने लोकांचा आक्रोश आहे. पुर्वीही आपत्ती येत होत्या आणि सरकार त्यांना मदत करत होते. आत्ता मात्र हे वारंवार होत होते. आराखडा तयार करून काम करावे लागेल. दरडी कोसळत आहेत. रस्ते खचत आहेत. सातत्याने पुराचा तडाखा बसत असल्याने पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. धोकादायक वस्तींचेही पुनर्वसन करणे हा मोठा आराखडा आहे. हे मोठे काम येत्या काही वर्षांत करावे लागेल. एकूण परिस्थिती पाहता हे संकट पाठ सोडणार नाही. आत्ताच ही वेळ आली आहे आणि ते आत्ताच केले पाहिजे. काही ठिकाणी कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. ब्लू लाईन, रेड लाईन याबाबत कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. आता केवळ लाईन मारून चालणार नाही. यापुढे कुठल्याही बांधकामांना परवानगी नाही. या संकटाच्या निमित्ताने आपल्याला हे निर्णय घ्यावे लागणार आहेत. धरणातून सोडल्या जाणार्‍या पुराच्या पाण्याचाही अभ्यास करू.’
सूचनांचे एकत्रीकरण
महापुराबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समित्यांबाबत ठाकरे म्हणाले, ‘महापुराबाबत नेमलेल्या सर्व समित्यांच्या अहवालचे एकत्रीकरण करून त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर अभ्यास. जर या समित्यांच्या शिफारशी अंमलात येणार नसतील तर त्या समित्या नेमून काहीच उपयोग नाही. संकट ओढवू नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. काही वेळेला आपल्यासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर लोकांनी सरकारच्या पाठीमागे राहिले पाहिजे. मला लोकांच्या जीवाशी खेळ खेळायचा नाही, त्यांच्याबाबत राजकारण करायचे नाही. आपल्याला कायमस्वरुपी काही मार्ग शोधावे लागतील. मुंबईत आपण भेटू आणि नवीन मार्ग शोधू. महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष एकत्र आले तर त्याच्या आड कुणी येणार नाहीत. अनेकांच्या सूचना येतात त्यातून व्यवहार्य मार्ग काढू.
मी पॅकेज मुख्यमंत्री नाही
मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही. मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्रीही मदत करणारे आहेत. तत्काळ मदत आम्ही जाहीर केली आहे. पाणी उतरल्यानंतर पंचनामे करून मदत केली जाईल. एनडीआरएफचे निकष बसलण्याबाबत आम्ही पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. सध्या कोरोनाच्या काळात कोराने अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे मी अवास्तव घोषणा करणार नाही, आम्ही केंद्राकडेही अवास्तव मागणी करणार नाही. बँका आणि विमा कंपन्यांना केंद्र सरकारने काही सूचना देण्याची गरज आहे. महसूल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून नुकसान भरपाई दिली पाहिजे.

About Belgaum Varta

Check Also

नेपाळच्या काठमांडूमध्ये मोठा विमान अपघात; १८ जणांचा मृत्यू; केवळ पायलट बचावला

Spread the love  काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठी दुर्घटना घडली. उड्डाण घेत असताना विमानाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *