Wednesday , July 24 2024
Breaking News

खानापूरजवळील कौंदल येथील ट्री पार्कचे वनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील कौंदल येथील वनखात्याच्या ट्री पार्कचे उद्घाटन सोमवारी दि. २० रोजी राज्याचे वन मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते करण्यात आले.
गेल्या बऱ्याच वर्षांपासून खानापूर वनखात्याच्यावतीने कंरबळ येथे ट्री पार्कचे आयोजन करण्यात आले. या ट्री पार्कमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी जंगलातील विविध वनऔषधी झाडाची माहिती मिळावी. नवनवीन पक्षी व इतर प्राण्याची माहिती मिळावी. याचबरोबर एअर जिम, प्ले एरिया, ट्रेकिग ट्रॅक आदीचा आनंद मिळावा या उद्देशाने ट्री पार्क उभारण्यात आले आहे.
यावेळी वनमंत्री उमेश कत्ती यांनी ट्री पार्कचे फित कापून उद्घाटन केले.
यावेळी आमदार अंजली निंबाळकर, डीएफओ हर्षा भानू, सीसीएफ मंजुनाथ चव्हाण, एसीएफ संतोष चव्हाण, वन खात्याचे डायरेक्टर सुरेश देसाई, तसेच करंबळ ग्राम पंचायत लक्ष्मी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. एसीफ संतोष चव्हाण यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. ऐन कार्यक्रमाच्यावेळी पावसाने हजेरी लागताच केवळ वनमंत्री उमेश कत्ती बोलताना म्हणाले, खानापूर तालुका जंगलमय तालुका आहे. अशा तालुक्यात विविध औषधी वनस्पती, पशु पक्षी याची मोठ्याप्रमाणात संख्या आहे. याचे चांगले जतन करा. जंगल वाढवा, असे आवाहन केले.
यावेळी आमदार अंजली निबाळकर यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमेद कोचेरी, भाजप नेते माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, भाजप नेते किरण यळ्ळूरकर, आपय्या कोडोळी, सचिव गुंडू तोपिनकट्टी, बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, राजेद्र रायका, युवा नेते पंडित ओगले, जाॅर्डन गोन्सालवीस, बाळू सावंत शिवा मयेकर आदी शेकडो भाजप कार्यकर्ते, वनखात्याचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आमगावच्या महिलेला डॉ. अंजलीताई फाउंडेशनची मदत

Spread the love  खानापूर : मागील दोन दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील आमगाव गावात हर्षदा घाडी नावाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *