Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील प्राथ. शिक्षकांचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : कंटीरवा स्टेडियम बेंगलोर येथे झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खानापूर तालुक्यातील कबनाळी प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक बापू दळवी यांनी ६७ किलो वजनी गटाच्या वेटलिफ्टिंग तसेच पावर लिफ्टिंग या दोन्ही क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत लक्षवेधक कामगिरी केली आहे. तसेच एमबीएस खानापूर शाळेचे शिक्षक व खानापूर नोकर संघटनेचे खजांची. जे पी. पाटील यांनी 87 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये तृतीय क्रमांक मिळवत यशाला गवसणी घातली आहे.
अबनाळी शाळेचे शिक्षक व तालुका शिक्षक संघटनेचे डायरेक्टर रमेश कवळेकर यांनी 60 किलो वजनी गटाच्या बॉडी बिल्डिंगमध्ये द्वितीय क्रमांक संपादन केल्यामुळे त्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. रमेश कवळेकर हे व्यायाम मंदिर करंबळ तसेच फिटनेस जिम खानापूर येथे आपला सराव करतात. त्यांच्या यशाबद्दल जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेबळी, खानापूर तालुक्याचे बीईओ लक्ष्मणराव एकुंडी, खानापूर नोकर संघटनेचे अध्यक्ष बी. एम. येळ्ळूर, बीआरसी अधिकारी ए. आर. अंबगी, अक्षर दासोह अधिकारी महेश परीट, कर्नाटक राज्य शिक्षक संघटनेचे संघटना कार्यदर्शी कृष्णा कौंदलकर, जिल्हा उपाध्यक्ष बी. बी. चापगावकर यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. या विजयी स्पर्धकाचे खानापूर तालुक्यातुन कौतुक केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *