खानापूर भाजप नेत्यांची गोवा मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
खानापूर : खानापूर मार्गे गोव्यात होणारी बेकायदेशीर चोरटी गो मांस वाहतूक व गायींची तस्करी बंद करण्यात यावीत व संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावीत यासंदर्भात खानापूर भाजपाचे युवा नेते पंडित ओगले व सहकारी कार्यकर्ते यांच्याकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांना निवेदन देण्यात आले.
दि. 5 जुलै रोजी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अनमोड, साखळी, महाराष्ट्र, कारवार मार्गे मोठ्या प्रमाणात गोमातेची व तिच्या मांसाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून काही दिवसावर बकरी ईद सण येऊन ठेपला असून त्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री तस्करी होत असते यासाठी चेक नाक्यावर कडक तपासणी करण्यात येवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच पोर्तुगीज राजवटीच्या काळात गोव्यातील अनेक पुरातन मंदिरांची मोडतोड करण्यात आली असून त्या सर्व मंदिरांचे पुर्णनिर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे त्याबद्दल त्यांचे खानापूर भाजपा युवातर्फे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंडित ओगले यांच्या कार्याचे कौतुक केले व खानापूर तालुक्यात एक मोठ्या गोशाळेचे निर्माण करा, असे सांगितले.
यावेळी अभिजीत चांदिलकर, किरण तुडयेकर, ज्ञानेश्वर देवलतकर, अमर दोडमणी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta