खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत नुतन एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड नुकताच करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य सुरेश सुळकर, कृष्णाबाई गिरी, शांताबाई मादार, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलींच्या स्वागतगीताने झाली. यावेळी मुख्याध्यापक एस. डी. यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्यांच्या निवडीसंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी सर्वानुमते नुतन एसडीएमसी अध्यक्षपदी महेश बबन सावंत यांची निवड करण्यात आली. तर उपाक्षपदी अनंत बाबू मादार यांची निवड करण्यात आली.
नुतन एसडीएमसी सदस्य पदी परशराम दुध्दापा बिर्जे, परशराम कल्लापा नंदगडकर, ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील, महेश यशवंत बिर्जे, दामोदर तुकाराम सुळकर, रामचंद्र शिवाजी देसाई, दिलीप महादेव पाटील, सदस्यापदी लक्ष्मी सुभाष पाटील, प्रतिभा परशराम मादार, पार्वती ईश्वर जोशिलकर, वैष्णवी गजानन सुळकर, आरती गणपती मिसाळ, गौरी गंगाराम गोरल, अश्विनी अशोक पाटील, पुजा महादेव सावंत, पार्वती शंकर सुळकर, आदीची निवड करण्यात आली.
यावेळी एसडीएमसी निवडणुकीच्यावेळी ग्राम पंचायत सेक्रेटरी श्री. कुंभार यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम. एन. कम्मार यांनी केले. तर आभार एस. आर. देसाई यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta