खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम सुरू आहे. तालुक्यातील गर्लगुंजी येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेची वर्गखोली शुक्रवारी रात्री कोसळली. ही घटना ताजी असतानाच मुडेवाडी (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेची इमारत नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री कोसळली. सुदैवाने रविवारी शाळेला सुट्टी होती त्यामुळे कोणतीच जीवितहानी झाली नाही. तालुक्यात मुसळधार पावसामुळे शाळा इमारतीच्या वर्गखोल्या कोसळण्याच्या घटना सतत चालु आहेत.
कारण मुडेवाडी येथील शाळा नेहमीच विद्यार्थ्यांनी गजबजलेली असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोहचला असता. रविवारी ही घटना घडल्याने जीवित हानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच सोमवारी शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक एम. व्ही. चोर्लेकर आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
मुडेवाडी येथील लोअर मराठी शाळेला दोन वर्ग खोल्या त्यातील एक वर्ग नादुरूस्त असल्याने वर्ग खोली बंदच होती. तर दुसर्या खोलीत पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग भरविण्यात येत होते. ती वर्गखोली रविवारी मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाली.
त्यामुळे आता मुडेवाडी गावच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळाच नाही.
आता विद्यार्थ्यांनी कुठे बसुन शिक्षण घ्यावे असा प्रश्न शाळेच्या एसडीएमसी कमिटीला गावकर्यांना व शिक्षक वर्गाला पडला आहे.
घटनेची माहिती मिळताच हलकर्णी ग्राम पंचायत पीडीओ, सदस्यांनी भेट दिली व पाहणी केली. तसेच संबंधित शिक्षण खात्याला ही घटनेची माहिती देण्यात आली.
खानापूर तालुक्यातील सतत मुसळधार पाऊस पडत आहे.
गेल्या 24 तासात पावसाची नोंद पुढील प्रमाणे आहे.
खानापूर : 15.8 मी.मी. नागरगाळी : 33.8 मी.मी. बिडी : 6.6 मी.मी., कक्केरी : 11.2 मी.मी., असोगा : 19.6 मी.मी., गुंजी : 41.6 मी.मी., लोंढा रेल्वे : 79 मी.मी., लोंढा : पी डब्ल्यू डी, 65.8 मी.मी., जांबोटी : 52 मी.मी., कणकुंबी : 91.8 मी.मी. पावसाची नोंद आहे.
Belgaum Varta Belgaum Varta