खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील याच्यावतीने कणकुंबी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी उपस्थित होते.
बक्षिसाचे वितरक म्हणून खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील होते. यावेळी जांबोटी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर, उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलीच्या स्वागतगीताने झाली. यावेळी मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले
दहावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या हस्ते बक्षिस देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत चांगले गूण मिळविले तर भविष्यात त्याना चांगला मार्ग मिळतो. आणि ते जीवनात नक्कीच यशस्वी होतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत तनमनधन लावून डोळ्यात तेल घालुन अभ्यास करावा. यश नक्कीच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उपस्थित पाहुण्याची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार एन. एस. करंबळकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta