खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी परिसरातील गावाना गावोगावी रेशनवाटप करण्याची मागणी खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार प्रविण जैन यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जुन महिन्याच्या १८ तारखेला यासंदर्भात निवेदनात देऊन महिना झाला तरी अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. तेव्हा पुन्हा सोमवारी दि. १८ रोजी तहसीलदार प्रविण जैन यांना निवेदन सादर केले आहे.
यावेळी तहसीलदार प्रविण जैन यांनी फूड सेक्शेन विभागाचे कोलकार याना सुचना करताच संबंधित रेशन दुकानदाराना गावोगावी फिरून रेशन वितरण करण्यास सांगतो असे आश्वासन दिले.
निवेदन देताना आम आदमीचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, सचिव शिवाजी गुंजीकर, सहदेव पाटील ग्राम पंचायत सदस्य निलावडे, रविराज मुतगेकर सदस्य, महादेव कावळेकर सदस्य निलावडे तसचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta