खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूर मराठी पत्रकार संघटनेचा पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार सहकार्य करतील, खानापूर युवा समितीने घेतलेला निर्णय योग्य असून मराठी प्रेमी जनतेने तो यशस्वी करावा, असे आवाहन पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे यांनी केले. यावेळी वासुदेव चौगुले, कृष्णा भरणकर आदी उपस्थित होते.
