खानापूर (सुहास पाटील) : खानापूर तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत. मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका प्रशासन कोणताच ठोस निर्णय घेण्यास तयार नाही.
त्यामुळे अशा कर्जबाजारीला शेतकरी कंटाळून आणि अनेक संकटाना त्रासुन गळफास घेणे, किटकनाशक प्राशन करणे, नदीत उडी मारून जीव देणे असे प्रकार घडतात. मात्र यामागचे कारण तालुका प्रशासन शोधुन काढणे काळाची गरज आहे.
हाळ झुंजवाडच्या (ता. खानापूर) गावच्या कर्जबाजारी शेतकऱ्याने गावच्या सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या मारूती मंदिरात गळफास लावून घेऊन आत्महत्या करणे ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे.
हाळ झुंजवाडचा शेतकरी मनोहर लक्ष्मण बिडीकर (वय ५९) हा वारकरी आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणात असणारा, वेसनापासुन चार हात लांबच असणारा मात्र अशा परिस्थितीत आत्महत्या करून जीवन संपविणे यामागे त्याची खरी परिस्थिती दु:खाचीच आहे. त्यामुळे पत्नी, मुले याचा विसर पाडून गळपास घेऊन आत्महत्या केली.
हभप मनोहर लक्ष्मण बिडीकर याने शेतीसाठी केव्हीजी बॅंकेकडून सहा लाख रूपये कर्ज तर विविध संघ संस्थांकडून ५० हजार रूपयाचे कर्ज घेतले होते.
दुसरीकडे अतिवृष्टीने पिकाचे झालेले नुकसान, त्यातच कर्जाचे वाढणारे हप्ते आशा संकटाना सामोरे जाणे असमर्थ ठरल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतला असावा.
तालुका प्रशासनाने कर्जबाजारी शेतकऱ्याच्या परिस्थितीचा थोडाफार विचार करणे गरजेचे आहे. मात्र तालुक्याचे दंडाधिकारी, कृषी अधिकारी, बँक अधिकारी याकडे गांभिर्याने कदीच पाहात नाहीत. तालुका प्रशानाकडून कर्जबाजारी शेकरीवर्गाकडे पाहण्याची प्रवृत्ती डोळस हवी. शेतकरी किती काबाडकष्ट करतो. तेव्हा त्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे ही भावनाच अधिकाऱ्यांना नाही.
मागील वेळेला याच शेतकरी वर्गाच्या ओल्या मिरची पिकाला काडीमोलची किंमत नव्हती.
याच शेतकऱ्यानी शेकडो क्विंटल ओली मिरची रस्त्यावर ओतुन सरकारचा निषेध केला. त्यावेळी तालुका तहसीलदारानी, कृषी अधिकारी वर्गाने थोडी देखील गांभिर्याने दखल घेतली नाही. शेकडो शेतकऱ्यांनी ओल्या मिरचीचे पिक बाद करून टाकले.
अशावेळी शेतकरी वर्गाच्या ओल्या मिरचीला दर दिला असता तर कर्जाचे हप्ते तरी फिटले असते. याची तालुका प्रशासनाने कदर केली नाही. आज याच शेतकऱ्याला गळपास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रसंग आला.
हाळ झुंजवाडचा कर्जबाजारी शेतकरी हभप मनोहर बिडीकर याने गळपास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तहसीलदार रेश्मा तालिकोटी, तालुका कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी बिडीकर कूटूंबाची भेट घे़ऊन सात्वंन केले.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2021/08/IMG-20210805-WA0028-660x330.jpg)