खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूरातून पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी खानापूर युवा समितीने घेतलेला निर्णय योग्य असून मराठी प्रेमी जनतेने तो यशस्वी करावा, असे आवाहन पत्रक लिहून आम्ही यशस्वी करू. यावेळी लक्ष्मण गुरव, कृष्णा देसाई, मारूती गुरव, विलास गुरव, विनोद गुरव, हणमंत गुरव, सुभाष गुरव, मऱ्यानी गुरव, विनायक घाडी, विनोद गुरव, विष्णू गुरव, रामू बाळकृष्ण गुरव, अनिल गुरव व आदी उपस्थित होते.
