खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांचे आवाहन
खानापूर : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाला साठ वर्षे पूर्ण झाले यानिमित्त सीमाभागातील 865 गावातील मोफत आणि सवलतीच्या दरात अभ्यासक्रम प्रवेश दिला जाणार आहे, त्यासाठी विद्यापीठाने ही महत्वकांक्षी योजना राबविली असून सीमाभागातील होतकरू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष यांनी केले आहे.
काल बेळगाव येथे शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र प्रमुख डॉक्टर भारती पाटील तसेच विद्यापीठाचे इतर प्राध्यापक व त्यांचे सहकारी यांनी बेळगाव येथे झालेल्या सभेत त्याबद्दल मार्गदर्शन केले होते. या योजनेचा लाभ खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे वाहन खानापूर तालुका महाराष्ट्र समिती व युवा समितीच्यावतीने करण्यात आले.
यावेळी खानापूर येथील विविध विद्यालयामध्ये भेट देऊन तेथील प्राध्यापक असतील किंवा विद्यार्थी असतील यांची भेट घेऊन त्यांना या योजनेची माहिती देण्यात आली व त्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले, यावेळी खानापूर समितीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते देवापणा गुरव, राजाराम देसाई, प्रतिक देसाई, किशोर हेब्बाळकर, मराठा मंडळ महाविद्यालयात भेट दिली असता प्राध्यापिका जयश्री बागेवाडी व प्राध्यापक मुल्ला यांनी आपले मनोगत व्यक्त करताना होतकरू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. होतकरू विद्यार्थ्यांसाठी खानापूर येथील राजा स्मारक येथे अर्ज उपलब्ध असून या संधीचा फायदा घ्यावा असे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta