Saturday , October 19 2024
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवारी बैठक

Spread the love

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कन्नड सक्ती विरोधात आणि मराठी परिपत्रके मिळविण्यासाठी ८ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक सोमवार दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिछत्रपती स्मारक भवन येथे बोलाविण्यात आली आहे. सदर बैठकीत १८ जुलै रोजी झालेल्या रास्तारोको आंदोलनाच्यावेळी माननीय तहसीलदारांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. त्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी तहसिलदारांची भेट घेणे तसेच खानापूर सरकारी इस्पितळात कन्नड सोबत मराठीत देखील फलक लावण्यासाठी निवेदन देण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे कस्तुरीरंगन अहवाल मार्फत इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये तालुक्यातील ६० गावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत, त्या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत विचार विनिमय करण्याचे ठरविले आहे. तरी तालुक्यातील आजी – माजी लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Spread the love  बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *