Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूरात सहाय्यक कृषी अधिकारी मुल्ला यांचा निवृत्त निमित्त सत्कार

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका कृषी कार्यालयाचे सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. मुल्ला हे ३६ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा कृषी कार्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषीअधिकारी डी. बी. चव्हाण होते.
तर व्यासपीठावर सत्कारमुर्ती सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. मुल्ला सपत्नीक, अधिकारी व्ही. जी. मुंचडी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मंजुनाथ कुसगत यांनी केले.
तर तालुका कृषीअधिकारी डी. बी. चव्हाण यांच्या हस्ते सत्कारमुर्ती सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. मुल्ला यांचा सपत्नीक सत्कार शाल, पगडी, पुष्पहार, भेटवस्तू व पत्नीला साडी चोळी देऊन कृषी खात्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मुल्ला सरांच्या कार्याबद्दल डी. एच. राठोड, एफ. एस. पवाडी, एच. जी. दासर, मंजुनाथ कुसगत, कंत्राटदार श्री. भरूकर व नातेवाईकांची भाषणे झाली.
शेवटी सत्काराला उत्तर देताना मुल्ला म्हणाले की, १९८५ साली बागलकोट येथून ग्रामसेवक म्हणून नोकरीला प्रारंभ झाला. तेथून १९८७ मध्ये हल्याळ कृषी कार्यालयातच बदली झाली. त्यानंतर १९८८ ते ९८ पर्यंत खानापूर कृषी कार्यलयात सेवा केली. त्यानंतर १९९९ ते २००० पर्यंत गोकाक येथे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून सेवा केली.
पुन्हा २००१ ते २००३ पर्यंत खानापूर जलानयन खात्यात सेवा बजावली. त्यानंतर २००४ ते ०६ पर्यंत बेळगाव कृषी कार्यालयात सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून सेवा केली. त्यानंतर २००६ ते २०२२ पर्यंत खानापूर कृषी कार्यालयात सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून सेवा बजावून ३० जुलै रोजी निवृत्त होत आहेत.
याकाळात मी व माझे शेतकरी यांचे नाते अतुट होत. शेतकरी वर्गाबद्दल नेहमी आदर होता. त्यामुळे आजही शेतकरी मला भेटून जातात. यापुढेही अशीच शेतकरी वर्गाबदल नेहमी आदर राहिल, असे विचार व्यक्त केले.
शेवटी अध्यक्षीय भाषणेत कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण म्हणाले की, नेहमीच हसत असणारे मुल्ला सर शेतकरी वर्गाचे मार्गदर्शक होते. प्रत्येक शेतकर्याला चांगले मार्गदर्शन करत.
शेवटी आभार मंजुनाथ कुसगत यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *