खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीला गावातील कचरा गावाबाहेर टाकण्यासाठी सरकारने कचरा गाडीची व्यवस्था केली आहे.
त्याचे वितरण तालुका पंचायतीकडुन नुकताच करण्यात आले.
यानिमित्ताने गर्लगुंजी ग्राम पंचायतीच्यावतीने कचरा गाडी वाहनाचा शुभारंभ मंगळवारी दि. २ ऑगस्ट रोजी करण्यात आला.
यावेळी गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे पीडीओ जी. एल. कामकर प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सौ. अनुराधा निट्टूरकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. तर उपाध्यक्ष सुरेश मेलगे यांनी कचरा गाडीला पुष्पहार वाहिला. यावेळी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी श्रीफळ वाढविला.
यावेळी उपस्थित ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आदिंच्या हस्ते सुका कचरा व ओला कचऱ्यासाठी बकेटचे नागरिकांना वितरण केले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य हणमंत मेलगे, परशराम चौगुले, प्रसाद पाटील, अजित पाटील, तसेच सदस्या रेखा कुंभार, सविता सुतार, अनपूर्णा बुरूड, वंदना पाटील, श्रीमती नाईक आदी सदस्या तसेच गावचे नागरिक नंदकुमार निट्टूरकर, संतोष पाटील, ग्रंथपाल संजू पाटील, जोतिबा सिध्दाणी, शंकर पाखरे, सोमनाथ यरमाळळकर, चन्नापा बुरूड, तसेच कर्मचारी दिपक पाटील, संजू भातकांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta