Wednesday , March 4 2026
Breaking News

सिंगीनकोप शाळेत एसडीएमसी कमिटीची निवड

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी मुलाच्या शाळेत एसडीएमसी कमिटीची निवड नुकताच करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी एसडीएमसी अध्यक्ष धोंडीबा कुंभार होते.
यावेळी शिक्षण प्रेमी कृष्णा कुंभार, ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, सदस्या माया कुंभार, बसापा पाटील, ओमाणा पाटील, देवाप्पा पाटील, मल्लापा पाटील, मोहन कुंभार, चिंतामणी तिरकणावर, पीडीओ श्री. देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत पी. के. सुतार यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. एल. डी. नलवडे यानी एसडीएमसी कमिटी निवड व त्याबदलची माहिती दिली.
यावेळी एसडीएमसी कमिटीच्या सदस्य पदी नागेश कुंभार, सोमनाथ मादार, परशराम पाटील, मोहन कुंभार, विश्वनाथ पाटील, एन. डी. पाटील, विनायक कुंभार, परशराम प्रभाकर पाटील, राजाराम पाटील तर सदस्यापदी चित्रा कुंभार, शालन पाटील, ललिता पाटील, लक्ष्मी कोलकार, मोहिनी कुंभार, माधुरी कुंभार, राजश्री पाटील, स्वाती कुंभार, वैशाली पाटील आदींची निवड करण्यात आली.
यावेळी सर्वानुमते एसडीएमसी अध्यक्ष पदी विश्वनाथ अर्जून पाटील यांची तर उपाध्यक्षा पदी चित्रा महादेव कुंभार यांची निवड करण्यात आली.
यावेळी शाळेच्या वतीने नुतन अध्यक्ष विश्वनाथ पाटील व उपाध्यक्षा चित्रा कुंभार यांचा पुष्पहार घालुन अभिनंदन करण्यात आले. यावेळी नुतन एसडीएमसी कमिटीबदल पीडीओ श्री. देसाई यांनी मार्गदर्शन केले.
तसेच माजी एसडीएमसी अध्यक्ष धोडीबा कुंभार यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी पालक, शिक्षण प्रेमी, गावचे पंच कमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
शेवटी आभार अतिथी शिक्षक नामदेव कुंभार यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *