खानापूर (विनायक कुंभार) : जांबोटी येथील कर्नाटका ग्रामीण बँकेच्या शाखेत गुरुवारी पहाटेच्या प्रहरला चोरीचा प्रयत्न झाला. तिघांची ओळख पटली असून यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँकेचे शेटर तोडून आत प्रवेश घेतला व लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान उपअधीक्षक शिवानंद कटगी, पोलीस उपनिरीक्षक शरणेश जालिहाल, हवालदार जयराम हमणावर आदींना सुगावा मिळवण्यासाठी तज्ञांची मदत घेतली. ठशामुळे त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी शक्य झाले. 6 जुलैला कितुर आंबडगट्टीतील केवीजी बँकेत चोरी झाली होती. त्यातही यांचा सहभाग असल्याचे समजते. खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोलिसांचे शोध पथक तयार केले होते.
Belgaum Varta Belgaum Varta