खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील
हायर प्रायमरी मराठी मुला- मुलींच्या शाळेच्या खेळाडूंना स्पोर्ट्ससाठी स्पोर्ट्स युनिफाॅर्म नितीन राजाराम पाटील ओनर खानापूर फिटनेस क्लब मि. बेळगांव व त्यांच्या पत्नी सौ. शिला नितीन पाटील यांनी केंद्र पातळीवरील स्पोर्ट्समध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना उत्कृष्ट जर्सी व पॅन्ट देऊन मदत केली.
यावेळी एसडीएमसी अध्यक्ष सदानंद पांडुरंग मासेकर, हेमंत घाडी, संदेश कोडचवाडकर, गोपी दळवी, मुख्याध्यापक भैरू पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते .
यावेळी एसडीएमसी अध्यक्ष सदानंद मासेकर यांनी नितीन पाटील व शिला पाटील या दाम्पत्यांचे स्पोर्ट्स जर्सी व पॅन्ट देऊन मदत केल्याबद्दल आभार मानले.
यावेळी स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिक्षिका विद्या मोरे, पौर्णिमा पाटील, एस. एम. कुंभार, आदी उपस्थित होते. शेवटी आभार नेताजी शिवणगेकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta