खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्त्याची बोंब झाली आहे. रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता अशी म्हणण्याची वेळ विद्यानगरातील रहिवाशाना आली आहे. मात्र याकडे नगरपंचायत, नगरसेवक डोळे झाक करत आहेत.
खानापूर शहराचा कायापलट होणार असे भविष्य वर्तविण्यात येत आहे. शहरातील रस्त्याची दुरूस्ती, त्याचबरोबर उपनगरातील विद्यानगरात सध्या रस्त्याची महाभयंकर अवस्था झाली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यानगरात रस्ता, गटारी करण्याकडे नगरपंचायतीने अद्याप लक्ष दिलेच नाही. त्यामुळे आजतागायत विद्यानगरात रस्ते झाले नाहीत, गटारीही झाल्या नाहीत.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना विद्यानगरातील रस्त्यावरून चालणे खूप कठीण होत आहे.
या भागाचे नगरसेवक रस्ता, गटारीसाठी नगरपंचायतीकडे मागणी करतील काय अशी मागणी विद्यानगरातील नागरिकांतून होत आहे.
विद्यानगर रस्त्यावर खड्डे, पाण्याची डबके
यंदाच्या मुसळधार पावसाने विद्यानगरातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचुन डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे या भागात लहान मुलांना, महिलावर्गाना रस्त्यावरून ये-जा करणे तारेवरची कसरत होत आहे.
तेव्हा नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन नागरिकांची सोय करावी, अशी मागणी केली आहे.
———
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरातील रस्त्याची इतकी दुर्दशा झाली आहे की रस्त्यावरून महिलांना तसेच लहान मुलांना ये-जा करणे फारच कठीण झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे टाळत आहेत.
– एक रहिवासी
