खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने कर्नाटक राज्याचे २३ वे नुतन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे बेगळूर येथे जाऊन अभिनंदन केले. व खानापूर तालुक्यातील विकास कामाबद्दल निवेदन सादर केले.
मुख्यमंत्री बसराज बोम्माई यांनी नुकताच शपथविधी घेतल्यानंतर खानापूर तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेंगळुरूला जाऊन मुखमंत्री बसवराज बोम्माई व मुरगेश निराणी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी विधान परिषद सदस्य महातेश कवटगीमठ, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, सुरेश देसाई संचालक वन निगम बेंगळुरू, माजी जि. पं. सदस्य बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, भाजप नेते किरण यळ्ळूरकर, वसंत देसाई, आपय्या कोडोळी, अशोक देसाई, धनश्री सरदेसाई, गुंडू तोपिनकट्टी, प्रकाश गावडे आदी भाजप नेते उपस्थित होते.
यावेळी खानापूर तालुक्यातील विकास आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्ते, पुल, शेती, घरे याची हानी झाली आहे याची माहिती देऊन यावेळी निवेदन सादर केले.
Check Also
बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी
Spread the love खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार …