खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील शिवाजीनगरातील श्रीकृष्ण मंदिर – बाल विकास केंद्र वास्तुशांती व कळसारोहण सोहळा रविवार दि. ७ रोजी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने सकाळी ९ वाजता श्री कृष्ण अभिषेक, १० वाजता बालविकास केंद्राची वास्तुशांती, ११.३० वाजता कळसारोहण व दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सांयकाळी ७ वाजता सुदर्शनी प्रभूजी यांचे श्री कृष्ण चरित्रावर व्याख्यान होणार आहे.
गर्लगुंजी गावात विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्याबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या हेतूने श्रीकृष्ण मंदिरामध्ये बालविकास केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. गावातील सरकारी मराठी मुलांची शाळा ढासळल्यामुळे दोन वर्ग या मंदिरात भरवण्यात येत आहेत. या मंदिराचे बांधकाम देणगीदाराच्या माध्यमातून पूर्ण झाले असून या मंदिराचा कळसा रोहन कार्यक्रम रविवारी होणार आहे. या कार्यक्रमाला देणगीदार व हितचिंतक गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीकृष्ण मंदिरातर्फे करण्यात आले आहे.
मंदिर उभारण्यापूर्वी सुरवातीला पैशाची अडचण भासत होती. यावर उपाय म्हणून आम्ही जी व्यक्ती कडुन ५ लाख रुपये देईल त्याचे नाव सभागृहाला देणे व रु. 25 हजाराहून देणगी देणाऱ्या व्यक्तीचा फोटो लावण्यात येईल. तसेच ५ हजार वर देणगीदारांची नावे बोर्डावर लिहिली जातील. असा सर्वानी निर्णय घेतला. त्यामुळे मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास मदत झाली. मंदिराच्या खालच्या हॉलमध्ये भक्तीमार्गासाठी व नामस्मरण, गोकुल अष्टमी, तुळशी विवाह असे कार्यक्रम गेली ६ वर्ष सतत चालू आहेत. वरचे सभागृह हे मुलांच्या शैक्षणिक विकासाठीच वापर करण्याचा हेतू आहे. तज्ञांची मदत घेऊन भविष्यामध्ये मुलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. कार्य करण्यासाठीच वापर करणे आहे. त्यामुळे देणगीदार गावकरी मंडळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन श्रीकृष्ण मंदिरातर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta