खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव काळात पावसाळा असल्याने पावसामुळे खानापूर शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडून रस्ते अतिशय खराब झाले आहेत. गणेश दर्शनासाठी खानापूर तालुक्यातील अनेक गावचे नागरीक शहरात येतात. यावेळी नागरीकाची गैरसोय होऊनये. यासाठी रस्त्याची डागडुजी करावी. तसेच रस्त्यावरील पथदिपांची व्यवस्था करावी. तसेच मलप्रभा नदीघाटावर गणेश विसर्जनावेळी क्रेनची व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर सार्वजनिक गणेशोत्सव अध्यक्ष भाजप नेते पंडित ओगले यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीचे मुख्य ऑफिसर बाबासाहेब माने यांना देण्यात आले.
त्याचबरोबर पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे वीज पुरवठा खंडीत होत असतो. तेव्हा वीजपुरवठा सुरळीत व्हावा.
याची खबरदारी घ्यावी. तसेच खानापूर शहरात १५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असुन डिपॉझिट मंडळाकडून कमी घेण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन खानापूर महामंडळाचे अध्यक्ष व भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या अध्यक्षतेखाली हेस्काॅमच्या अधिकारी सौ. कल्पना तिरवीर यांना देण्यात आले.
यावेळी नगरसेवक नारायण ओगले, प्रकाश देशपांडे, आपय्या कोडोळी, किरण तुडयेकर, दिपक चौगुले, सोमनाथ गावडे, राहूल सावंत, सागर आष्टेकर, मंगल गोसावी, आनंद बेळगावकर, अरूण चौगुले, संदिप शेंबले, आदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta