खानापूर (विनायक कुंभार) : गुंजी येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये किरावळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
मुलींच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच वैयक्तिक क्रीडा स्पर्धामध्ये जयश्री ज्योतिबा गोडसे हिने १०० मी धावणे व लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक, आरती संजय नाईक हिने ४० किलो वजन गटातील कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक, विजया पाटील हिने ४५ किलो वजन गटांमध्ये प्रथम, वेदिका गोडसे ४० किलो वजन गटांमध्ये द्वितीय तसेच प्रेरणा नाईक हीने ४५ किलो वजन गटात द्वितीय अशा प्रकारे यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झालेली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. चापगावकर, सहशिक्षक वाय. एम. कुकडोळकर, संतोष बडीगेर यांचे मार्गदर्शन लाभले. गुंजी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बी. ए. देसाई, क्षेत्र समन्वयाधिकारी श्री. अंबगी सर, क्षेत्र शिक्षणाधिकारी श्रीमती राजेश्वरी कुडची पी.ई.ओ. श्रीमती मिरजी यांनी विजेत्या संघाचे व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta