Wednesday , March 4 2026
Breaking News

माणिकवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन….

Spread the love

 

खानापूर : के. एल. ई. तांत्रिक महाविद्यालय बेळगाव आणि प्रा. शंकर आप्पाणा गावडा, सौ. प्रिती परशराम गोरल, ग्रा. पं. सदस्य माणिकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महालक्ष्मी ग्रुपचे प्रमुख श्री. विठ्ठलराव सोमाना हलगेकर, प्रमुख अतिथी म्हणून म. ए. समितीचे नेते श्री. मुरलीधर पाटील, मराठी संस्कृतीक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, के. एल. ई तांत्रिक महाविद्यालयाचे प्रा.हंजी, शिंदोली ग्रा. पं. अध्यक्ष राजेश पाटील, उपाध्यक्ष गणपती सुतार, माजी सैनिक महादेव गावडा, गंगाराम होणगेकर आणि शेकडो शिबिरार्थीच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी उदघाटक या नात्याने बोलताना श्री. विठ्ठल हलगेकर म्हणाले की, शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती. ती निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे, राहत्या घराच्या आसपास स्वच्छतेचे वातावरण राखले पाहिजे जेणे करून डेंग्यू, चिकनगुनिया वगैरे साथीचे रोग पसरणार नाहीत. पसरल्यास अशाप्रकारच्या मोफत आरोग्य शिबिरांतर्गत समाजात जागरूकता करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते श्री. मुरलीधर पाटील, मराठी संस्कृतीक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, के.एल्. ई. तांत्रिक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर हंजी यांचे मनोगत झाले. यावेळी यावेळी प्रजावाणी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री. विठ्ठलराव सोमांना हलगेकर यांचा व भूविकास बँकेचे चेअरमन श्री. मुरलीधर गणपती पाटील, डॉक्टर हंजी, पंचायत सदस्य लक्ष्मण तीरवीर तसेच कोरोना काळात अगदी तळागाळापर्यंतच्या व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांच्या आरोग्याचा दुवा बनलेल्या आशा कार्यकर्त्यां सौ. संगीता सुरेश गावडा आणि नुकताच माणिकवाडी गावातून गरीब अशा कुटुंबातून मराठी शाळेमध्ये शिक्षण घेऊन बी. एच. एम. एस. प्रशिक्षण घेणाऱ्या कुमार श्रीनिवास राजाराम सुतार यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर शेष गिरी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर सिद्धेश घोडेकर, डॉक्टर राधिका देवलकर यांनी दंत, नेत्र, रक्तदाब, मधुमेह चाचणी केली. यावेळी तांत्रिक महाविद्यालयाच्या वतीने वैद्यकीय संचाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के. एल. ई. तांत्रिक महाविद्यालयाचे कु. रितेश पाटील, आरती बसरीकट्टी, आदिनाथ गुरव, समर्थ पुजारी, माणिकवाडीचे युवा कार्यकर्ते, नामदेव गावडा, परशुराम गोरल, कृष्णा मिराशी, रणजित गोरल, निखिल बेडरे, यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. शंकर गावडा यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *