खानापूर (प्रतिनिधी) : माचीगड (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व पणे येथील रहिवासी पीटर डिसोझा यांचा वाढदिवस शनिवारी दि. ७ रोजी पुणे येथे उत्साहात पार पडला.
पीटर डिसोझा यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छावेळी बोलताना ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संचालक शिवाजी जळगेकर म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, शासकीय, राजकीय, उद्योग, व्यापार, कृषी, आदी क्षेत्रात आपली बैठक दांडगी आहे. सुदैवाने मलाही आपल्या संपर्कात येण्याचं भाग्य लाभलं आणि बर्याच काही गोष्टी शिकता आल्या. परमेश्वराने प्रत्येकाला काहीना काही विशेष बहाल केलेले आहे. आणि म्हणूनच त्या कृतज्ञताप्रित्यर्थ प्रत्येकाने समाजाच्या प्रती यथाशक्ती आणि यथावकाश देणे लागते हा आपला विश्वास. देताना नेहमी सर्वात पुढे असणे तर घेताना सर्वात मागे, सामाजिक कार्य करताना संयम असणे आणि अपमान पचवण्याची तयारी असणे, केलेले सामाजिक कार्य हे खुद्द स्वतःच्याही लक्षात न ठेवणे आणि त्याची प्रसिद्धी न करणे अशा एक ना अनेक गोष्टी आपणाकडून शिकण्यासारख्या आहेत. सामाजिक कार्य करत असताना त्याला सर्वसमावेशकता देण्याबरोबरच त्यातून समाजबांधनीही व्हावी असा कायम आपला प्रयत्न असतो. आज 61 व्या वर्षात पदार्पण करताना समाजासमोर एक उत्तम आदर्श आपण ठेवलात. अनेकांना आपला हा जीवनपट आदर्शवत आणि अनुकरनीय असून त्यावर चालण्यासारखा नक्कीच आहे.
पुणे येथील निवासस्थानी पीटर डिसोझा यांच्या वाढदिवसाला ठाण्याहुन सुधीर पाटील व साधना पाटील यांची खास उपस्थिती होती. त्याचबरोबर रामचंद्र निलजकर, परशराम चौगुले, अजित पाटील, शिवाजी जळगेकर, नारायण पाटील, परशुराम निलजकर, नारायण गावडे, रामचंद्र बाळेकुंद्री, भगवान चन्नेवाडकर, अशोक पाटील, रामू गुंडप, बाळकृष्ण पाटील, उमाजी देवकर, पांडुरंग पाटील, लक्ष्मण पेडणेकर, शांताराम पाटील, प्रशांत गुंजीकर, शांताराम बडसकर, नामदेव पाटील, उमेश निलजकर, ज्ञानेश्वर गावडे, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, संजय सुतार, शमकर गुरव, नारायण पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरानी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी लक्ष्मण दत्ता भेकणे, केदार शिवणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय पाटील यांनी केले. तर आभार देमाणी मष्णूचे यांनी मानले.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …