खानापूर (प्रतिनिधी) : रविवारी खानापूर शहारातील शिवस्मारक चौकातील बसस्थानकाजवळ बसचे ब्रेक निकामी झाल्याने आणि बस मागे गेल्याने तहसील कार्यालयाची संरक्षण भिंत कोसळली. मात्र जीवीत हानी टळली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खानापूर आगाराची खानापूर बेळगाव बस क्रमांक के. ए. २५ एफ ३२२९ ही दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खानापूर हून बेळगावला जाण्यासाठी शिवस्मारक चौकातील बसस्थानकावर आली. यावेळी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसमागे आली व लागुनच असलेल्या तहसील कार्यालयाची भिंत बसचा धक्क्याने कोसळली. मात्र जीवीतहानी टळली.
रविवारचा दिवस आसल्याने तहसील कार्यालयाला सुट्टी होती. त्यामुळे लोकांची वर्दळ नव्हती. दररोज या संरक्षण भितीला लागुन अनेक दुचाकी, चार चाकी वाहने उभी असतात. मात्र रविवार असल्याने एकच मारूती कार उभी होती. त्यावर भिंत कोसळल्याने कारचे नुकसान झाले.
यावेळी नागरिकांनी बघ्यांची गर्दी केली होती.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …