खानापूर (प्रतिनिधी) : समाजाला सुधारण्याचे काम केवळ शिक्षकच करतो. म्हणून शिक्षक हा समाजाचा कणा आहे.
शिक्षकांनी मुलांना शिक्षणाबरोबरच समाजात कसे राहावे याचे नेहमीच मार्गदर्शन केले आहे. त्याचा नेहमीच समाजाने आदर करावा, असे मत डॉ. डी. एन. मिसाळे व्यक्त केले.
शंभोलींग शिवाचाया महास्वामी हिरेमन्नोळी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर तहसीलदार प्रविण जैन, नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरपंचायतीचे स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश बैलूरकर, बाईओ राजेश्वरी कुडची, शिक्षक संघटना अध्यक्ष वाय. एम. पाटील, संचालक एम. आर. चवलगी, श्री. तुरमुरी, श्रीधर गणाचारी, बी. बी. चापगावकर, हायस्कूल विभागाचे सलिम कित्तूर, व्ही. बी. होसुर, महांतेश कित्तूर, डी. एन. हलकी, टी. आर. पत्री, एस. बी. जकाती, टी. बी. मोरे, एस. व्ही. कुणी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने झाली. यावेळी क्षेत्र समन्वय अधिकारी ए. आर. आंबगी यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या फोटोचे पुजन तहसीलदार प्रविण जैन व सरस्वती फोटो पुजन शंभोलींग शिवाचार्य यांच्या हस्ते करण्यात आले
तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते लक्ष्मण कोणे यांनीही शिक्षक दिनाचे महत्व विषद केले.
यावेळी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळातील निवृत्त शिक्षकाचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजीव वाटूपकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta