


बेळगाव : नंदगडमध्ये ऐतिहासिक गेली ७९ वर्ष एक गाव एक गणपती परंपरा चालत आलेली आहे. गेली २ वर्ष कोरोनामुळे बसवेश्वर मंदिरात अत्यंत सध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला, पण या वर्षी मंडळ मोठ्या उत्साहात बाजारपेठमध्ये गणेशोत्सव साजरा करत आहे. या वर्षी मंडळाने युवकांवर उत्सवाची जबाबदारी सोपवलेली आहे. रोज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सकाळ आणि संध्याकाळी मोठ्या संख्येने लोकं आरतीला उपस्थित राहत आहेत. येत्या गुरुवारी ८ सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने गणहोम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ९.०० वाजता भव्य खुल्या एकेरी आणि दुहेरी (Solo & Duet) डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. डान्स स्पर्धेसाठी ५००१, ३००१, २००१, १००१, ५५१ अशी बक्षीस ठेवण्यात आली आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta