खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील महालक्ष्मी शैक्षणिक संस्थेच्या खानापूर येथील महेश पीयू कॉलेज शांतीनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी विद्या भारती खेल परिषद धारवाड आयोजित फुटबॉल स्पर्धेत यश संपादन केले. त्यांची राष्ट्रीयस्तरावर निवड झाली.
नुकताच राष्ट्रोत्थान विद्या केंद्र, धारवाड येथे झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत महालक्ष्मी शैक्षणिक संस्था, खानापूरच्या शांतीनिकेतन महेश पदवीपूर्व महाविद्यालयाच्या फुटबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावून त्याची राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल
संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी खेळाडूंचा गौरव केला. संस्थेचे सेक्रेटरी प्रा. राजेंद्र एस. पाटील, व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य प्रसाद पालनकर व सर्व प्राध्यापक यांनी फुटबॉल संघातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विनित भालेराव व सुदीप कांबळे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. सागर कोलेकर व ओंकार गावडे यांनी मार्गदर्शन केले. या सामन्याचे कर्णधारपद मोनेश यळ्ळूरकर याने सांभाळले. उपकर्णधार साहिल हुदली. सोबत खेळाडू वैष्णव घाडी, वैष्णव देवलत्तकर, श्री पाटील, स्वरूप बेळगावकर, सुशांत कदम, यश माळवे, सचिन लकमोजी, कुशल तलवार, श्रीधर बेळगावकर, आर्यन देसाई, गौतम, सिद्धार्थ पाटील. संकल्प पाटील यांनी सहभाग घेतला. या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या यशाबद्दल तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta