
खानापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आज खानापूर येथे भाजप तक्रार निवारण केंद्राच्या कार्यकर्त्यांसह डॉ. सोनाली सरनोबत (भाजप महिला मोर्चा ग्रामीण उपाध्यक्ष) यांनी फळ व फुलांच्या रोपांची लागवड केली.
मोदीजींनी केलेल्या योजना आणि अनेक विकास प्रकल्पांची माहिती यावेळी सोनाली सरनोबत त्यांनी दिली.
भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाला बसवराज कडेमनी, बाळेश चव्हाण्णावर, परशराम कोलकार, कुश अंबोजी, कल्लाप्पा कंग्राळकर, वैष्णवी भोसले, दीपक चौगुले, शशिकांत नाईक, नागेश रामजी, विनायक नाईक, विनोद पावले, अक्षय कुष्टी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta