खानापूर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्यावाढदिवासाचे औचित्य साधुन खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबरपासून दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत.
नुकताच रक्तदान शिबीराचे आयोजन करून येथील सरकारी दवाखान्यात मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहेत.
यावेळी बोलताना बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी बोलताना सांगितले की, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत खानापूर तालुक्यातील शहरासह तालुक्याच्या विविध गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
बुधवारी दि. २१ रोजी जांबोटी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तर सकाळी खानापूर शहरातील कोर्टजवळ मोफत रोपाचे वाटप करण्यात येत आहे.
तरी तालुक्यातील जनतेने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी व तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी केले आहे.
येथील सरकारी दवाखान्यात बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, मेडिया प्रमुख राजेंद्र रायका, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, वसंत देसाई, रवी बडगेर, मोहन पाटील, सुनिल मासेकर, सुनिल नाईक आदी शेकडो खानापूर तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta