Wednesday , March 4 2026
Breaking News

कौंदल गावात स्वच्छता मोहीम यशस्वी

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : कौंदल (ता. खानापूर) गावात 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी व आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कौंदल गावाचे ग्रामदैवत श्री. माऊलीदेवी देवस्थानाच्या आवारात स्वछता मोहीम राबविण्यात आली.
या स्वछता मोहिमेमध्ये ग्रामपंचायत पी डी. ओ. एस. ए. मदरी, अध्यक्षा सौ. लक्ष्मी पाटील, ग्रामपंचायत पंचायत सदस्य उदय भोसले, सौ. शुभांगी घाडी, सर्व पंचायत कर्मचारी अंगणवाडी शिक्षिका व गावातील ज्येष्ठ पंच मंडळी पुंडलिक उमान्ना कोलेकर, डी. एम. भोसले गुरूजी, उमान्ना देवाप्पा पाटील, शंकर पाटील, पुंडलिक विठोबा पाटील, बाळकृष्ण म्हात्रू पाटील, कृष्णा जळगेकर, खेमानी कुरूमकर, चेतन चंद्रकांत पाटील व तरुण वर्ग उपस्थित होते. या सर्वांच्या सहकार्यातून श्रीमाऊलीदेवी देवस्थानकडे स्वच्छता अभियान करण्यात आले.
या स्वच्छता अभियानामुळे ग्राम दैवत माऊली देवी देवस्थानचे आवार स्वच्छ झाले. त्यामुळे कौंदल गावच्या ग्रामस्थांतून समाधानाचे वातावरण पसरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *