खानापूर : आज नंदगड येथे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी काढण्यात आलेल्या दुर्गा दौडचे स्वागत दुर्गानगर नंदगड येथे आनंदी वातावरणात मोठ्या उत्साहाने करण्यात आले. दौडमध्ये तरुण युवक व युवतींची तसेच लहान दौडकांची लक्षणीय उपस्थिती होती. आज पहाटे लक्ष्मी मंदिर येथून दौडची सुरुवात होऊन सांगता कार्यक्रम दुर्गानगर येथे पार पाडला.
यावेळी दौडचा भगवा ध्वज घेण्याचा मान माजी आमदार अरविंद पाटील यांना दिला गेला. तसेच आपल्या आमदारकीच्या कालावधीत दुर्गा नगर वसाहतीतील दत्त मंदिराचा जीर्णोद्धार तसेच या प्रभागातील केलेल्या मूलभूत विकास कार्याबद्दल दुर्गानगरवासी व पंच कमिटीतर्फे अरविंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर दुर्गादौडची आरती आणि ध्येय मंत्राने सांगता झाली. यावेळी दुर्गानगरमधील पंच कमिटी, ज्येष्ठ मंडळी, प्रभागामधील ग्रामपंचायत सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta