खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी आणि संपूर्ण तालुक्यात पुन्हा एकदा मराठी अस्मिता ज्वलंत करण्यासाठी ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आज सीमासत्याग्रहात अग्रणी असलेले जळगे गावी बैठक घेऊन पालखीचा उद्देश सांगण्यात आला.
गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच ज्येष्ठ सीमासात्याग्रही श्री. बाबुराव रवळू गुरव यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला भूविकास बँकेचे चेअरमन श्री. मुरलीधर गणपतराव पाटील, समिती नेते श्री. यशवंत लक्ष्मण बिर्जे, श्री. प्रकाश चव्हाण, श्री. महादेव घाडी, श्री. नारायण कपोलकर, श्री. रूकमांना झुंज्वाडकर, मरू पाटील, अमृत पाटील हे उपस्थित होते.
तसेच यावेळी गावातील नागरिक महादेव निकळकर, पुंडलिक शिवणांगेकर, परशुराम लाड, मधू गुरव, पवन गुरव, मल्हारी तोपिंकट्टी, विनायक गुरव, परशुराम निलजकर, नागेश पाटील, अशोक पाटील, महेश पाटील, रावळू गुरव, रुक्माणा गुरव, नारायण निलजकर, पुंडलिक लाड, विठ्ठल ठाकर, रमाकांत पाटील, दत्तू लाड, नामदेव पाटील, आकाश पाटील,वैभव पाटील, मुरलीधर गुरव, मारुती पाटील, दत्तू शिवंगेकर, मारुती शिवंगेकर, राजू शिवंगेकर, गंगाराम पाटील, खेमाजी पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta