खानापूर (सुहास पाटील यांजकडून) : खानापूर तालुक्यातील अतिमागासलेल्या आणि दुर्गम अशा जंगल भागातील शिरोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जामगाव (ता. खानापूर) भागात नेटवर्क नसल्याने शिक्षकांनी दिलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा बट्टयाबोळ झाला आहे.
सध्या कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईनचे धडे घ्यावे लागत आहेत. परिस्थितीने गरीब असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना पालकाकडुन महागडे मोबाईल देऊन जामगावसारख्या भागात नेटवर्क नाही. तर दुसरीकडे हजारो रुपये घालुन मोबाईल घेतला. एवढे करून ही विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा नेटवर्क अभावी काहीच लाभ नाही.
शिक्षकवर्ग अभ्यासक्रम मोबाईलव्दारे शिकवतात. मात्र जामगावसारख्या गावात नेटवर्क नाही. त्यामुळे शिक्षकाशी संपर्कच होत नाही.
यात विद्यार्थी, पालक वैतागला आहे. तेव्हा शिरोली ग्रामपंचायतीन नेटवर्कसाठी टॉवरसाठी सरकारकडे प्रयत्न करून विद्यार्थ्याच्या ऑनलाईन शिक्षणाची सोय करावी, अशी मागणी पालक व विद्यार्थी वर्गातुन होत आहे.
प्रतिक्रिया
जामगावसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी मोबाईलव्दारे आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु जामगाव परिसर अतिघनदाट जंगलाने वेढलेला आहे. याठिकाणी रेंज नाही की, नेटवर्क नाही. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून वंचित होत आहेत. परंतु त्यांचा अभ्यास व्हावा. यासाठी आमचा सतत प्रयत्न सुरू आहे.
– सी. ए. जैनापूरे, सहशिक्षक, शिरोली हायस्कूल
प्रतिक्रिया
आमच्या जामगाव गावात कोणतीच रेंज येत नाही. की नेटवर्क नाही. त्यामुळे महागडे मोबाईल घेऊन ही ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. शिवाय अभ्यासातील अडचणी विचारण्यास रेंज मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे.
– एक विद्यार्थी.
Check Also
लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …