खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील चापगांव मराठी प्राथमिक शाळेच्या तीन खोल्या आणि कन्नड प्राथमिक शाळेची खोली अशा चार खोल्या कोसळण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा शिक्षण खात्याच्यावतीने चारही खोल्या लवकरात लवकर दुरूस्त करून विद्यार्थी वर्गाची सोय करावी. अशा मागणीचे निवेदन शिक्षण खात्याच्या बीईओ कार्यालयाला देण्यात आले. यावेळी बीईओ कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी यांनी निवेदनाचा स्विकार करून शाळा खोल्याची दुरूस्ती करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना चापगांव ग्राम पंचायत अध्यक्षा सौ. स्नेहल सयाजी पाटील, उपाध्यक्ष मारूती चोपडे, सदस्य नागराज यळ्ळूरकर, माजी सभापती सयाजी पाटील, मुख्याध्यापक, तसेच सीआरपी पी. जी. पाखरे, पीडीओ बन्ने आदी उपस्थित होते.
Check Also
लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …