खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे आणि बीपीएल फौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रुपालीताई चाकणकर यांच्या सहकार्याने गुरूवारी सणस शाळा धायरी फाटा, पुणे या ठिकाणी पुणेस्थित बेळगाववासीयांसाठी सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00 या दरम्यान मोफत लसीकरणाचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. पुणेस्थित खानापूर-बेळगाव च्या उद्योजकांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांबरोबर इतरही कर्मचाऱ्यांनी या संधीचा लाभ घेतला.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले निलेश चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, सुहास चाकणकर, सुनिताताई डांगे, पूजा लोंढे, खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेचे अध्यक्ष पीटर डिसोझा, उपाध्यक्ष लक्ष्मण काकतकर, बाळासाहेब देसाई, भगवान चन्नेवाडकर, नारायण पाटील, संचालक परशुराम चौगुले, सुरेश हालगी तर बीपीए रसलचे अध्यक्ष केदार शिवणगेकर, उपाध्यक्ष संदीप घाडी, शांताराम बडसकर, दत्ता भेकणे तसेच उद्योजक सतिश पाटील, अविनाश हुलसुळे, योगेश बराटे आदीजण उपस्थित होते.
प्रारंभी सर्वजणांच्या उपस्थित दिपप्रज्वलन करण्यात आले तर निलेश चाकणकर आणि या लसीकरण शिबीराचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थी म्हणून नागेंद्र पाटील आणि आरती वागळे यांच्याहस्ते गणेश पूजन करण्यात आले. रूपालीताई चाकणकर यांनी विडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून आपले विचार माडले तर पीटर डिसोझा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून या लसीकरण शिबिराच्या आयोजनासाठी मेहनत घेतलेल्या समितीतीचे विशेष कौतुक केले. प्रास्ताविक सचिव शिवाजी जळगेकर यांनी केले तर आभारप्रदर्शन दत्ता भेकणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह-सचिव विजय पाटील यांनी केले. यावेळी संचालक रामचंद्र निलजकर, अशोक पाटील, परशराम निलजकर, नारायण गावडे, देमाणी मष्णुचे, बाळकृष्ण पाटील, पांडुरंग पाटील, अशोक वीर, प्रशांत गुंजीकर, शांताराम पाटील, विजय सावंत, नामदेव पाटील, सुधीर शिवणगेकर, महादेव टक्केकर, नारायण वीर, चंद्रकांत पाटील, अमोल हंगीरकर, देवेंद्र हंगीरकर, नारायण पाटील (शिवठान) आदीजण उपस्थित होते.