खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मुख्य बसस्थानकाच्या प्रवेशव्दारावरच खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गातून तसेच बसचालकांतून नाराजीचे सुर पसरले आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मुख्य बसस्थानकाच्या प्रवेशव्दारावरच मोठ मोठे खड्डे पडले आहेत. याकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर तालुका लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला आहे.
त्यामुळे अपघात होण्याचा संभव आहे.
यंदाच्या मुसळधार पावसाने तालुक्यातील रस्त्याची वाट लागली आहे. अनेक नद्या, नाल्यांच्या पुलाचीही दुरावस्था झाली आहे.
खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मुख्य बसस्थानकाच्या प्रवेशव्दारावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशाना तसेच बसचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे प्रवाशातून नाराजी पसरली आहे.
यावेळी बोलताना जॉर्डन गोन्सालवीस म्हणाले की, संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने अथवा लोकप्रतिनिधीनी खड्डे त्वरीत बुजवुन प्रवाशांना होणारा त्रास थाबवावा. अन्यथा खड्ड्यात रोप लागवड करण्यात येईल, असा ईशारा दिला आहे.
तेव्हा संबंधितांनी याची दखल घेऊन खड्डे बुजवावे अशी मागणी होत आहे.
