बेळगाव : अंजेनयनगर येथील अद्भुभुत जीवन मुखी फाउंडेशन यांच्यावतीने कोरोनामुळे मृत्यू पडलेल्या मराठा सेंटरचे सेवानिवृत्त जवान सुनील गावडे यांचे चिरंजीव शिवाजी गावडे यांची गोगटे वाणिज्य महाविद्यालयाच्या कॉलेजच्या प्रथम वर्षाची फि भरून आर्थिक सहाय्य करण्यात आले.
गोगटे कॉलेजच्या प्राचार्यांच्या कक्षात अद्भुभुत जीवन मुखी फाउंडेशनचे अध्यक्ष किरण पाटील, व्हॅक्सीन डेपो येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मुतन्याळ, विणा जोशी यांच्या हस्ते गोगटे पदवीपूर्व कॉलेजमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या शिवाजी गावडे यांची प्रथम वर्षाची वार्षिक फी 23200 रूपये कॉलेजच्या प्राचार्य डॉ. ए. एस. केरूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली,
मराठा सेंटरचे सेवानिवृत्त जवान सुनील गावडे यांचे कोरोना काळात कोरोनाच्या संसर्ग रोगामुळे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या परिवारावर आर्थिक संकट निर्माण झाले याची दखल घेत डॉ, एस व्ही मुतन्याळ व किरण पाटील यांनी त्यांच्या परिवाराला भेट देऊन त्यांची विचारपूस करून त्यांच्या मुलाचा प्रवेश खर्च उचलला.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …