बेळगाव : भाजप, काँग्रेस, जेडीएस पाठोपाठ आता आम आदमी पक्षानेही बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाने आपल्या काही उमेदवारांची नावे आज पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत.
आम आदमी पक्षाचे बेळगाव प्रभारी लक्ष्मीकांतराव यांनी बुधवारी बेळगावात पत्रकार परिषदेत पक्षाच्या निवडणूक निर्णयाची माहिती दिली. बेळगाव मनपाच्या सर्व ५८ प्रभागात आप आपले उमेदवार उभे करणार आहे.
त्यांच्या प्रचारासाठी राज्यसभा सदस्य संजयसिंग, रोमी भाटी व अन्य नेते येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही. तसेच जर अशी पार्श्वभूमी असल्याचे समजून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
Check Also
चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …