नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची गरज : घरांच्या सर्वेची प्रतीक्षा
कोगनोळी : मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोगनोळी येथील अनेक घरांची पडझड झाली आहे. तर या पुरामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसला असला तरी शासनाकडून अद्याप सर्वे करण्यात आला नसल्याने नागरिकांच्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील दुधगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे येथील भिमनगर, लोखंडे गल्ली, मगदूम गल्ली याठिकाणी पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला होता. अनेक घरांची पडझड झाली असून अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधींनी भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. पण या ठिकाणी पडझड झालेल्या घरे व संसार वाहून गेलेल्या लोकांचा सर्वे न झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
2019 साली आलेल्या महापुरामध्ये भिमनगर व अन्य ठिकाणी घरांची मोठी पडझड झाली होती. यावेळी झालेल्या सर्वेमध्ये किरकोळ पडझड झालेल्या नागरिकांना मोठी रक्कम मिळाली. त्याचप्रमाणे एकाच घरातील दोन-तीन लोकांना त्याचा लाभ मिळाला होता. अनेक नागरिकांचे घर पडून देखील त्यांना लाभ मिळाला नसल्याचा येथील नागरिकांनी आरोप केला आहे. पूरग्रस्त भागाचा सर्वे हा प्रामाणिक पणे व्हावा व खरोखर लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. भीमनगर येथील नागरिकांचे स्थलांतर येथील मराठी प्राथमिक मुला-मुलींच्या शाळेत करण्यात आले होते.
मगदूम गल्ली व अन्य ठिकाणच्या नागरिकांनी इतरत्र स्थलांतर केले होते. याचबरोबर या दुधगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे अनेक शेती मध्ये पाणी गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचा सर्वे व्हावा व शेतकर्यांनाही शासनाकडून भरघोस अशी मदत मिळावी अशी अपेक्षा येथील नागरिकांच्या कडून करण्यात येत आहे. कोगनोळी येथील पूरग्रस्त नागरिकांना व शेतकर्यांना आता सर्वे कधी होणार याची चिंता लागून राहिली आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
Check Also
निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी
Spread the love आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : …