खानापूर : धावत्या कारमध्ये स्फोट होऊन बघता बघता कारने पेट घेतल्याची घटना बेळगावजवळील चोर्ला घाटात घडली.
गोव्याहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या कारला आज शनिवारी पहाटे चोर्ला घाटात आग लागली. नंतर कारने पूर्णपणे पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारला आग लागल्याचे लक्षात येताच गाडीतील प्रवाशांनी लागलीच गाडीबाहेर धाव घेतली. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. कारला आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta